अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा एकामागोमाग एक व्हेरिअंट येत आहे. ओमायक्रॉन तर डेल्टापेक्षा 70 पटींनी पसरणारा आहे. हा कोरोना व्हायरस हवेतून कसा पसरतो यावर यूनिवर्सिटी कॉलेज लंडन मध्ये नुकतेच संशोधन केले आहे.(corona news)
जगभरातील लोकांना आता मास्क घालून फिरणे सामान्य वाटू लागले आहे. आम्ही मास्क परिणामकारक आहे की नाही यावर अभ्यास करत आहोत. कोरोना व्हायरस हवेद्वारे कसा पसरतो, हे आम्हाला समजून घ्यायचे आहे.
यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखले जाऊ शकेल. मास्क हवेतून निघालेले कण नियंत्रित करू शकतो का हे आम्हाला शोधायचे असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
जेव्हा आम्ही बोलतो, खोकतो किंवा श्वास घेतो तेव्हा आपल्या तोंड आणि नाकाद्वारे हवा बाहेर पडते. यावेळी फुफ्फुस, गळा आणि तोंडातून श्वसन तरंगणारे कण एकत्र करते आणि त्याव्दारे या हवेतील थेंबांचे निर्माण होते.
हे थेंब हवेत सोडले जातात. खोकणे किंवा बोलण्यासाठी जी शक्ती खर्ची पडते त्यातून हे कण तयार होतात. अधिकतर कण हे पाय मायक्रॉनपेक्षाही कमी असतात, ज्याला आपण एअरोसोल म्हणतो.
यापेक्षा मोठा थेंब हा 100 मायक्रॉन एवढा मोठा असू शकतो. हे एअरोसोल तासंतास हवेत तरंगत असतात आणि ते संक्रमण पसरवू शकतात. लोकांमधील व्हायरल लोडच्या भिन्नतेमुळे मास्कचे फायदे अचूक मोजणे कठीण आहे,
असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. मास्क वापरणाऱ्या संक्रमित व्यक्तीद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या व्हायरसचे प्रमाण कमी होते. मात्र, मास्कची किती मदत मिळते हे तो व्यक्ती किती प्रमाणात व्हायरस सोडतो त्यावर अवलंबून आहे, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम