चोरी कैद होईल म्हणून चोरटयांनी सीसीटीव्ही मशिनच चोरून नेले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  एका इलेक्ट्रिकल्स दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानातील वायर बंडल आणि इतर सुमारे अडीच लाख किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे घडली.

विशेष म्हणजे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याने चोरट्यांनी सीसीटीव्ही मशिन देखील चोरून नेले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सचिन इलेक्ट्रिकल्सचे मालक महेंद्र अशोक खेडके यांनी लोणी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी बुद्रुक येथील संगमनेर रस्त्यावरील सचिन इलेकट्रीकल्स या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 98 वायर बंडल,

तांब्याच्या अर्थींग प्लेट व इतर वस्तू असा सुमारे अडीच लाखांचा माल चोरून नेला. लोणी पोलिसांनी खेंडके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान सचिन इलेक्ट्रिकल्स चे सीसीटीव्ही मशीन चोरून नेण्यात आले असले तर लोणी ग्रामपंचायत, प्रवरा बँक आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बँका,

दुकाने यांच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात एक संशयित इनोव्हा कार मध्यरात्री आढळून आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!