जिल्ह्यातील ‘ या’ पोलीस ठाण्यास मिळाला खमका अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहुरी पोलीस ठाण्याला खमक्या आधिकारी मिळाला असून तांत्रिक विश्लेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

नाशिक प्रताप पांडुरंग दराडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी त्यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याचा आदेश राहुरी पोलीस ठाण्यास प्राप्त झाला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या दीड वर्षांपासून पोलीस निरीक्षक वादग्रस्त ठरत असल्याने अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीवर एकही पोलीस निरीक्षक टिकू शकला नाही.गेल्या १५ दिवसांपासून राहुरी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षकाविना कारभार चालू होता.

नाशिक येथून नव्याने नगर येथे बदली होऊन आलेले प्रताप दराडे काल नगर येथे हजर झाले असता त्यांना लगेच राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील मूळचे रहिवासी असलेले दराडे यांनी यापूर्वी मुंबई,पालघर, मनोर व स्थानिक गुन्हे अन्वेशाखा भोईसर येथे स.पो.नि. म्हणून तर नाशिक येथे तांत्रिक विश्लेषक शाखेच्या वरीष्ठ निरीक्षकपदी काम पाहिले आहे.

अत्यंत शिस्तप्रिय व खमक्या आधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. राहुरी तालुक्यात गुन्हेगारीची वाढ झाली असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एका खमक्या अधिकाऱ्याची राहुरी तालुक्यास अत्यंत गरज होती त्यानुसार खमक्या आधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नियुक्ती झाली असल्याची चर्चा आहे.

दराडे हे राहुरी तालुक्याची गुन्हेगारी आटोक्यात आणतील का..? का राजकीय गटबाजीला बळी पडतील याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चा चालू आहे.

दराडे हे शुक्रवारी पदभार स्वीकारतील असे बोलले जात आहे.येत्या काही दिवसांतच त्यांच्या कामाची कार्यपद्धती तालुक्यासमोर लवकरच येणार आहे.