अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- झाड तोडण्याच्या मजुरीवरून झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केला. व नंतर पसार झालेल्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
बबन श्रीधर वारुळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर पांडु पवार असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संजय पांडु पवार हे कुटूंबियासह पिंप्री घुमरी येथे बाभळीची लाकडे तोडुन त्यापासुन कोळसा तयार करण्याचे काम करतात.

यांचे वडील पांडु पवार यांचे गावातील बबन वारुळे याच्याबरोबर बाभळीची झाडे तोडण्याचे मजुरी वरुन वाद घालुन धक्काबुक्की झाली होती.
त्यावेळी संजय पवार यांनी बबन वारुळे यास आत्ता झालेल्या कामाचे पैसे द्या. मी उद्या सकाळी राहिलेले काम करुन घेईन, असे म्हणुन वाद मिटवला होता.
परंतु दि.२१ जानेवारी रोजी बबन वारुळे याने झाडे तोडण्याच्या पैशाच्या कारणावरुन पांडू पवार यांच्या डोक्यात धारदार हत्याराने मारुन खून केला.
नंतर तो पसार झाला. तो नगर तालुक्यात असल्याची माहिती आष्टी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कळविली.
त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेमुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने शेंडी शिवारातील टोलनाका परिसरात संशयीतरित्या फिरताना बबन श्रीधर वारुळे (रा . पिंप्री घुमरी,ता.आष्टी, जिल्हा बीड) यास अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम