अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील भागडा चारीचे थकीत वीज भरण्यासाठी जलसंपदा विभागाकडून 47 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
तसेच भागडा चारी सक्षम करण्यासाठी शासनाकडून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे देखील तनपुरे म्हणाले.
राज्यमंत्री तनपुरे यांनी भागडा चारी आजअखेर थकलेल्या वीजबिलासाठी 47 लाख रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाला असून या रक्कमेतून महावितरण कंपनीला थकीत बील भरल्यानंतर भागडा चारी सुरु करण्यात
आली व भागडा चारीतून पाणी चिंचविहीरेकडे झेपावले असून या पाण्यातून भागडा चारीवरील सर्व तलाव भरण्यात येतील. दरम्यान काळे आखाडा येथील भागडा चारीला पाणी सोडण्यात आले.
त्यावेळी ना. तनपुरे बोलत होते. भागडा चारी योजनेतील काही विद्युतपंप नादुरुस्त असून त्यासाठी तसेच योजनेचे जे पाईप नादुरुस्त आहेत, त्या सर्वांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे ना. तनपुरे यांनी सांगितले.
यावेळी भागडा चारीवरील लाभार्थीच्यावतीने ना. तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नान्नोर उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम