ओप्पोचा हा 128 जीबी स्टोरेज वाला स्मार्टफोन मिळवा अवघ्या पाच हजारात

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- फ्लिपकार्टवर नेहमीच स्मार्टफोन्सवर काही ना काही ऑफर्स सुरु असतात. अशीच एक ऑफर तुम्हाला 23,000 रुपयांच्या आसपासचा स्मार्टफोन 6000 पेक्षा कमीमध्ये विकत घेण्याची संधी देत आहे.

हा फोन आहे Oppo F19s …. हा स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येईल. कसा ते जाणून घ्या

किंमत – Oppo F19s च्या एकमेव 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 22,990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टकडून मिळालेल्या 13 टक्के सवलतीनंतर हा डिवाइस 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 14,800 रुपयांची बचत करू शकता.  त्यामुळे Oppo F19s ची प्रभावी किंमत 5,190 रुपये होईल.

स्पेसिफिकेशन्स – ओप्पो एफ19एस मध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

हा एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे त्यामुळे यात इन-डिस्प्ले फिंगप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

या ओप्पो मोबाईलमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटचा वापर कंपनीने केला आहे. OPPO F19s अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 वर चालतो.

त्याचबरोबर यात 6GB रॅम आणि 5GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे.

कॅमेरा – फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो.