अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावात आणखी वाढला आहे. याचे परिणाम जगावर होताना दिसून येत आहे. यामुळे शेअर बाजरात मोठी पडझड होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.
नुकतेच याचा मोठा परिणाम मॉस्को मध्ये दिसून आला. रशियाच्या मॉस्को शेअर बाजारामध्ये याचे प्रतिबिंब उमटले आहेत. सोमवारी, मॉस्को शेअर बाजार तब्बल 14 टक्क्यांनी कोसळला.
रशियाच्या हद्दीत घुसलेल्या युक्रेनच्या लष्करी वाहनांना उद्धवस्त केल्याचे वृत्त समोर आले होते. याच्या परिणामी मॉस्को शेअर बाजारात मोठी पडझड झाली.
तसेच युरोपीयन देशांमधील शेअर बाजारात घसरण झाली. फ्रान्स शेअर बाजार 2.07 टक्के, जर्मन शेअर बाजार 1.94 टक्के, Euro Stoxx 50 हा 2.13 टक्क्यांनी घसरला.
तर, ब्रिटनच्या . FYSE100 मध्ये 0.4 टक्के आणि स्पेनच्या IBEX35 निर्देशांकात 0.7 टक्क्यांनी घसरण झाली. दरम्यान आंतरराष्ट्रीय शेअर बाजारावरही युद्ध तणावाचे पडसाद दिसून आले.
आता, मंगळवारी भारतीय शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मॉस्को शेअर बाजाराचा निर्देशांक RTS मध्ये रशियातील 50 मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करतो.
मॉस्को शेअर बाजारात जवळपास 230 अंकांची म्हणजे 16.67 टक्क्यांनी कोसळून निर्देशांक 1160.24 अंकावर आला होता. युद्ध सुरू झाल्यास रशियावर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रशियातील गुंतवणूकीवरही होणार आहे.