यूपीमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज (23 फेब्रुवारी) होत आहे. चौथ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे.

यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे.

सायंकाळी 6 वाजेपर्यंत आजची मतदान प्रक्रिया चालणार आहे. या टप्प्यात एकूण 2.12 कोटी मतदार मतादानाचा हक्क बजावणार आहेत.

या टप्प्यात 624 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 2017 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 59 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या.

याशिवाय समाजवादी पार्टीला चार, बसपाला तीन आणि भाजपचा मित्रपक्ष अपना दलला एक जागा मिळाली होती. त्याचवेळी, पहिल्या तीन टप्प्यात यूपी विधानसभेच्या 403 जागांपैकी 172 जागांसाठी मतदान झाले आहे.

तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 59 विधानसभा जागा रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, उन्नाव, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यातील आहेत.

कडेकोट बंदोबस्त :- चौथ्या टप्प्यातील मतदान आणि त्यानंतर होणाऱ्या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. मतदान केंद्र, स्ट्राँग रूम आणि ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी 860 कंपनी निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

यूपी पोलिसांचे 7022 निरीक्षक, उपनिरीक्षक, 58132 कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल चौथ्या टप्प्यात तैनात करण्यात आले आहेत.

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी 21 कंपनी पीएसी, 50 हजार 490 होमगार्ड, 1850 पीआरडी जवान, 8486 चौकीदार यांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe