पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सावत्र मुलासह तिघांना पोलिसांनी दारू बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
मात्र, वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गालिब मार्केट पोलिसांनी सोमवारी सकाळी मानेका याच्या गाडीतून दारू जप्त केली आहे.

या प्रकरणात मोहम्मद अहमद मानेका आणि त्याचा चुलत भाऊ मुहम्मद मूसा मानेका यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. वास्तविक मोहम्मद अहमद मानेका हा इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा आणि तिच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे.
मानेका त्याच्या दोन मित्रांसोबत प्रवास करत होता. यादरम्यान पोलिसांनी त्याला लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमजवळ कारमध्ये दारू ठेवल्याप्रकरणी ताब्यात घेतले.
उच्च अधिकार्यांच्या आदेशानंतर आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मानेकासह या तीन तरुणांना त्याच दिवशी सोडण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मानेकाला दारूसोबत पकडले असता त्याने तेथे उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांना धमकावले आणि परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आणि मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा मुलगा असल्याचे सांगितले.
या संदर्भात मोहम्मद अहमद मानेका आणि त्याचा चुलत भाऊ मुहम्मद मूसा मानेका यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. तसंच मानेका यांचा आणखी एक मित्र अहमद शहरयार याच्यावरदेखील गुन्हा दाखल झालाय.
रुग्णालयात तपासणी अंती शहरयार नशेमध्ये आढळून आला होता. मूसा आणि अहमद यांना मानेका कुटुंबियांकडून देण्यात आलेल्या हमीनंतर सोडण्यात आले.
कारण पकडले गेले तेव्हा त्यांनी दारू घेतलेली नव्हती. शहरयार याला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. तसेच जप्त करण्यात आलेली दारू पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून दिली.