अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :-तंत्रज्ञानाच्या युगात आजकाल कंप्यूटर शिक्षण हे अत्यंत महत्वाचे झाले आहे. यातच कंप्यूटर म्हंटले कि त्याच्यावरील कीबोर्ड बाबत सर्वाना एक प्रश्न पडतो तो म्हणजे कीबोर्डवरील अक्षरे सरळ का लिहलेले नसतात.
जर ही ABCD सरळमध्ये लिहिली असती तर टायपिंग किती सोपे होईल! परंतु हा अनेक विचाराचा परिणाम आहे. ज्यामुळे आज टायपिंग सहज केलं जाऊ शकत. वास्तविक कीबोर्डचा इतिहास टाइपरायटरशी संबंधित आहे.
म्हणजेच कॉम्प्युटर किंवा कीबोर्ड येण्यापूर्वीच QWERTY फॉरमॅटही वापरला जात होता. १८६८ मध्ये, टाइपरायटरचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर लॅथम शोल्सने प्रथम एबीसीडीई फॉरमॅटवर कीबोर्ड बनवला. पण त्याला अपेक्षित गतीने आणि सोयीस्कर टायपिंग होत नसल्याचे दिसून आले. ABCD असलेल्या कीबोर्डमुळे टाईपरायटरवर लिहिणे अवघड होत होते.
मुख्य कारण म्हणजे त्याची बटणे एकमेकांच्या इतकी जवळ होती की टायपिंग करणे कठीण होते. याशिवाय, इंग्रजीमध्ये काही अक्षरे आहेत जी जास्त वापरली जातात जसे की E, I, S, M आणि काही शब्द क्वचितच आवश्यक आहेत जसे की Z, X, इ. या प्रकरणात, अधिक वारंवार वापरल्या जाणार्या अक्षरांसाठी,
कीबोर्डवर बोट हलवावी लागत होती आणि टाइपिंग स्लो होत होते. दरम्यान १८७० मध्ये QWERTY स्वरूप आले. लोकांना QWERTY मॉडेल सर्वाधिक आवडले, त्यामुळे ते लोकप्रिय झाले