“शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही जनआंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावू”; राजू शेट्टींचा आघाडी सरकारला इशारा

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- महावितरणाच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून वीज तोडणीच्या विरोधात तर काही ठिकाणी वीज मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर मध्ये 10 दिवस आंदोलन देखील केले.

पण सरकार फक्त आश्वासन देण्याचे काम करत असल्याची टीका शेट्टी यांनी ठाकरे सरकार विरोधात केली. तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही जन आंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

शेतकरी आता महावितरणच्या विरोधात आक्रमक झाले आसून शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु, तो अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही.

शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर धरणे बांधली आणि विजनिर्मिती करण्यात आली.परंतु, याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही, असे शेट्टी यांनी म्हणाले.तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी चांगलीच आक्रमक झाली आहे.

आता त्यांनी शेतकऱ्यांना जर वीज नाही मिळाली तर वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असा इशारा दिला आहे.याबाबत सर्व माहिती गोळा करायचे काम सुरु असून या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

यामुळे पुन्हा एकदा शेट्टी विरुद्ध ठाकरे सरकार असा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकार येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe