बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ती’ आमची चूकच झाली!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुंबईत शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य यांच्यात घमासान सुरू आहे. त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या पाठबळामुळेच राणा दाम्पत्य असे धाडस करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

मात्र खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाव्यावरच निवडून आल्या आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले.

याला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ती आमची चुकच झाली. आघाडी भक्कम करण्यासाठी आम्ही त्यावेळी राणा यांना पाठिंबा दिला.

त्यांना निवडूनही आणले. मात्र, आठवडाभरातच त्यांनी पलटी मारली.याचे आम्हालाही दु:ख वाट आहे.’ राणा दम्पत्यामागे भाजपच असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.

ते म्हणाले, ‘सध्या महागाईसह अन्य प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी असे प्रकार घडवून आणले जात आहे.

अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांना हे सर्व कळून चुकले आहे. तर आमचीही आघाडीही भक्कम आहे,’ असेही थोरात म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe