Trending News Today : मांजर किंवा कुत्र्यामुळे कोणी करोडपती किंवा लखोपती झालेली तुम्ही ऐकले आहे का? पण अशीच एक घटना घडली आहे. एक मांजरीमुळे (Cat) तिची मालकीण लखोपती झाली आहे. या गोष्टीवर तुमचाही विश्वास बसणार नाही.
पण हे खरे आहे. हे प्रकरण अमेरिकेतील (America) वॉशिंग्टनमध्ये समोर आले आहे. काही लोकांनी एका मांजरीवर आरोप केला होता की ती इतर प्राण्यांना त्रास देते. यानंतर मांजरीला दंड ठोठावण्यात आला.
नंतर मांजराच्या मालकाने उच्च प्राधिकरणाकडे दाद मागितली असता, त्यांना तेथून ९५ लाख रुपयांची भरपाई मिळाली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
शेजाऱ्यांनी केस केली होती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये मिस्का (Miska Cat) नावाची एक मांजर आहे. या मांजरीचे मालक अण्णा डॅनेली आहे. 2019 मध्ये, अण्णा डॅनेलीच्या शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी मांजरीवर आरोप करत केस दाखल केली.
या मांजरीने इतर पाळीव प्राण्यांना त्रास दिल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला. यानंतर न्यायालयाने (Court) मांजरीला २३ लाखांचा दंड ठोठावला. एवढेच नाही तर या मांजरीला अॅनिमल कंट्रोलकडे पाठवण्यात आले. तिथे ती किटी जेलमध्ये राहिली.
मांजरीची मालकिन उच्च न्यायालयात पोहोचली
दरम्यान, मांजरीचे मालक अण्णा डॅनेलीने सरकारी संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या खटल्याची सुनावणी तीन वर्षे चालली. नंतर, न्यायालयाने असे मानले की मांजरीची चूक नाही आणि तिने इतर कोणत्याही प्राण्याला त्रास दिला नाही.
या मांजरीने कोणाच्याही घरात परवानगीशिवाय प्रवेश केलेला नाही. अशा स्थितीत कोर्टाने जुनी शिक्षा फेटाळून लावत मांजराच्या मालकाला 95 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.