Vatsavitri Puja : जेष्ठ महिन्यातल्या येणाऱ्या पौर्णिमेला वट पौर्णिमा असे म्हणतात.
वट सावित्रीचा सण हा 14 जून रोजी साजरा होणार आहे.
जर तुम्हाला बाहेर वडाच्या पारावर जाणं शक्य नसेल तर घरीच वडाचे छोटे रोटपे किंवा वटपौर्णिमेचा कागद लावून त्याची पूजा करावी.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्यावर हळद-कुंकू , अक्षता वाहून पूजा करावी.
वडाच्या मुळाची व सती मातेची याच पद्धतीने पूजा करावी.
त्यानंतर सती मातेजवळ विड्याची पानं ठेवून त्यावर पैसा-सुपारी ठेवावी.
सोबतच हिरव्या काचेच्या बांगड्या, गळसरी, पुजेचं वस्त्र, पाच फळं ठेवावीत.
नंतर गुळ-खोबरं व पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. सारं काही व्यवस्थित झाल्यावर कापूर आरती करावी.
पूजा झाल्यावर स्त्रियांनी वडाला दोरा गुंडाळत सात फेऱ्या माराव्यात.
नंतर सुवासिनी महिलांना कुंकू लावून त्यांच्या कपाळात गुलाल भरावा.
दरम्यान, या दिवशी स्त्रियांनी पूर्ण दिवस उपवास करावा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.