Dhirubhai Ambani Daughters : जगातील टॉप १० व्यावसायिकांमध्ये धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांचे नाव आदराने घेतले जाते.अंबानी कुटुंबाची सातत्याने चर्चा होत असते. धीरूभाई अंबानी यांना दोन मुलांव्यतिरिक्त दोन मुली (Daughter) होत्या.
मुकेश अंबानी यांची बहीण साखर कारखान्याची मालकीण आहे

नीना कोठारी यांचा विवाह 1986 मध्ये एचसी कोठारी (HC Kothari) ग्रुपचे अध्यक्ष भद्रश्याम कोठारी यांच्याशी झाला होता. मात्र, 2015 मध्ये भद्राश्यामचे कर्करोगामुळे (Cancer) निधन झाले. सध्या नीना कोठारी या साखर कारखान्याच्या मालक आहेत.
एचसी कोठारी समूह प्रामुख्याने साखर, रसायन आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात काम करतो. नीना कोठारी यांना मुलगी नयनतारा आणि मुलगा अर्जुन कोठारी आहे. दोघे विवाहित आहेत. नीना यांचा मुलगा अर्जुन कोठारी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे.
नयनताराचा प्री-व्हेंडिंग कार्यक्रम मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया (Antilia) येथे झाला. नयनताराचे लग्न केके बिर्ला यांचा नातू शमितसोबत झाले आहे. नीना अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमाचा एक भाग आहे, तरीही त्या चित्रे आणि व्हिडिओमध्ये क्वचितच दिसते.
दीप्तीने अंबानी कुटुंबात पहिला प्रेमविवाह केला होता
दीप्ती अंबानी (Deepti Ambani) यांचा विवाह राज साळगावकर यांच्याशी 1983 मध्ये झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दीप्तीचे वडील धीरूभाई आणि राजचे वडील वासुदेव साळगावकर हे दोघेही त्या काळातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते.
दोघेही मुंबईत एकाच इमारतीत राहत होते. त्याचबरोबर दत्तराज साळगावकर आणि मुकेश अंबानी हेही चांगले मित्र होते. अंबानी कुटुंबात दीप्तीने पहिल्यांदा प्रेमविवाह केला होता.
नीरव मोदीच्या धाकट्या भावाचे लग्न मुकेश अंबानी यांच्या भाचीशी झाले होते
दीप्ती यांचे पती दत्तराज साळगावकर हे देशातील प्रसिद्ध फुटबॉल संघाचे मालक साळगावकर आहेत. याशिवाय, ते व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक आहेत, जे खनिज उत्खनन, लोह खनिज निर्यात, रिअल इस्टेट आणि आरोग्य क्षेत्रात गुंतलेले आहे.
दीप्ती पतीसह गोव्यात स्थायिक आहे. दीप्ती आणि दत्तराज यांना दोन मुले आहेत. मुलगा विक्रम आणि मुलगी इशेता. इशेताने २०१६ मध्ये नीरव मोदीचा लहान भाऊ निशाल मोदीशी लग्न केले. दोघांचा घटस्फोट झाला.
आता इशेताने अतुल्य मित्तलसोबत लग्न केले आहे. अतुल्य हा विनोद मित्तल यांचा मुलगा आणि बिझनेस टायकून लक्ष्मी निवास मित्तल यांचा पुतण्या आहे.