Shrawan 2022 : आजपासून श्रावण (Shrawan )महिन्याला सुरूवात होत आहे. शिवभक्तांसाठी (Devotees of Shiva) हा महिना खूप खास असून या महिन्यात भाविक भगवान शंकराची विधिवत पूजा (Worship) करत असतात.
ज्योतिषांच्या मते, श्रावण महिन्यात काही राशींवर (Zodiac) भगवान शंकराची विशेष कृपा असू शकते. श्रावण महिन्यात भक्त भगवान शिवाला पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक करतात. या महिन्यात भक्त भोलेनाथाची विशेष पूजा करतात.

भोलेनाथाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक या महिन्यात विशेष उपाय देखील करतात.
श्रावणमध्ये या राशींवर भोलेनाथाची विशेष कृपा राहील
भगवान भोलेनाथ सर्वांवर आशीर्वाद देत असले तरी 3 राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना खूप फलदायी असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, श्रावण महिन्यात ग्रहांची स्थिती खूप खास असेल आणि 3 राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी सिद्ध होईल.
मेष –
मेष (Aries) राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना खूप खास असणार आहे. या दरम्यान मेष राशीच्या लोकांना शिवाच्या आशीर्वादाने शुभ परिणाम मिळतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल, सकारात्मक लाभ होतील आणि मान-सन्मानात वाढ होईल. या महिन्यात मेष राशीच्या लोकांनी शिवाला पाण्याचा अभिषेक केला तर ते खूप चांगले सिद्ध होते.
मिथुन –
मिथुन (Gemini) राशीच्या लोकांसाठी श्रावण हा महिना खूप फलदायी ठरेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूप शुभ राहील. व्यावसायिकांसाठीही हा काळ अतिशय आनंददायी आणि चांगला राहील. या महिन्यात जास्तीत जास्त शिवाची पूजा करावी.
मकर –
श्रावण महिन्यात मकर (Capricorn) राशीच्या लोकांना शिवाची कृपा लाभेल. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या महिन्यात भगवान शंकराला पाण्याने अभिषेक केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.
श्रावण महिन्यातील सोमवारच्या तारखा
18 जुलै, सोमवार – श्रावणचा पहिला सोमवारचा उपवास
25 जुलै, सोमवार – श्रावणचा दुसरा सोमवारचा उपवास
01 ऑगस्ट, सोमवार – तिसरा सोमवारचा उपवास
08 ऑगस्ट, सोमवार – चौथा सोमवारचा उपवास