Krishna Janmashtami 2022 : कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मदिवस होय. हा सण गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणूनही मोठ्या जल्लोषात साजरा (Celebrate) करतात.
हिंदू धर्मात (Hinduism) कृष्ण जन्माष्टमीला विशेष स्थान आहे. त्यामुळे या दिवशी काही चुका (Mistakes) टाळणे गरजेचे आहे.

तुळशीची पाने तोडू नका
श्री कृष्णजी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि तुळशी विष्णूजींना खूप प्रिय आहे. अशा वेळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विसरुनही तुळशीची पाने (Basil leaves) तोडू नयेत.
कृष्णाला पूजेत अर्पण करण्यासाठी एक दिवस आधी तुळशीला तोडून टाकावे, कारण तुळशीची पाने शिळी मानली जात नाहीत.
भात खाऊ नका
ज्याप्रमाणे एकादशीला भात (Rice) खाणे वर्ज्य मानले जाते, त्याचप्रमाणे जन्माष्टमीलाही उपवास नसला तरी भात खाऊ नये.
सात्विक आहार घ्या
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी फक्त सात्विक अन्नच खावे. लसूण, कांदा (Onion) या दिवशी जेवणात वापरू नये, कारण लसूण कांदा तामसिक वर्गात ठेवला जातो. त्याच वेळी, मांस आणि मद्य सेवन करू नये.
गाईचा छळ करू नये
कान्हाला गाय खूप आवडते. लहानपणी तो गुराख्यांसोबत गाई चरायला जात असे. म्हणून जन्माष्टमी किंवा इतर कोणत्याही दिवशी गाय आणि वासरू मारू नका, अन्यथा कृष्ण रागवेल. गायींची सेवा केल्याने कृष्णाजी प्रसन्न होतात.
कोणाचाही अपमान करू नका
भगवान श्रीकृष्णासाठी गरीब-श्रीमंत सर्व भक्त सारखेच आहेत, त्यामुळे कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी विसरुनही कोणाचाही अनादर किंवा अपमान करू नका. कोणत्याही गरीब व्यक्तीचा अपमान केल्याने श्रीकृष्णाला राग येऊ शकतो.