PAN Card : पॅन कार्डमध्ये नावात झाली आहे चूक तर ‘ह्या’ स्टेप फॉलो करून करा नावात बदल

Ahmednagarlive24 office
Published:

PAN Card : पॅन कार्ड ( PAN Card) हे आपल्या सर्वांत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी (documents) एक आहे. आयकर जमा करणे, बँकेत व्यवहार करणे आणि अशा इतर कामांसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे.

याशिवाय तुम्ही अनेक ठिकाणी पॅनकार्डद्वारे तुमची ओळख सिद्ध करू शकता. पण कधीकधी अशी समस्या उद्भवते जेव्हा आपले नाव पॅन कार्डमध्ये चुकीचे छापले जाते. अशा परिस्थितीत आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

तुमचे नाव दुरुस्त करू शकता

जर तुमचे नाव पॅन कार्डमध्ये चुकीचे छापले गेले असेल, तर तुम्ही नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेडच्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या नावात सुधारणा करण्यासाठी अर्ज करू शकता.

याशिवाय, जर तुमचे नाव इतर सरकारी कागदपत्रांमध्ये बरोबर असेल आणि तुम्ही पॅन कार्डमध्ये नाव दुरुस्तीसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही ई-पॅन देखील डाउनलोड करू शकता.

ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे

ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुम्हाला www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html ला भेट द्यावी लागेल. तेथे पेजवर तुम्हाला ‘डाऊनलोड ई-पॅन’चा पर्याय दिसेल.

तेथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल. या स्टेपनंतर, तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि तुमची जन्मतारीख टाकावी लागेल.

त्यानंतर अटी आणि शर्ती स्वीकारून आणि कॅप्चा टाकून सबमिट वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी (One Time Password) येईल.

OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर पेमेंटचा पर्याय येईल. येथे तुम्हाला 8.26 रुपये द्यावे लागतील.

तुम्ही हे पेमेंट UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे करू शकता. पेमेंट झाल्यानंतर, ई-पॅन कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते. तुमची जन्मतारीख आणि पासवर्ड टाकून तुम्ही त्याची PDF फाइल उघडू शकेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe