Tips and Tricks : आपल्या घराची साफ सफाई करणे खूप गरजेचे आहे. एका ठराविक वेळेस आपण आपल्या पूर्ण घराची सफाई करतो. परंतु, अनेकवेळा आपण इलेक्ट्रिक स्विच बोर्डच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो.
त्यामुळे कालांतराने तो खूप खराब होतो. जर तुमचाही इलेक्ट्रिक स्विच बोर्ड खराब झाला असेल तर काळजी करू नका. इलेक्ट्रिक स्विच बोर्डच्या सफाईसाठी काही टिप्स फॉलो करा. लगेच तुम्हाला परिणाम दिसून येईल.
तुमचा जुना स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी घरातील मुख्य वीज बंद करा. याशिवाय घरातील सर्व सदस्यांना सांगा की तुम्ही घाण झालेले स्विच बोर्ड साफ करणार आहात. अशा स्थितीत मुख्य विजेचा स्वीच चालू करू नका. याशिवाय हातात ग्लोव्हज आणि पायात चप्पल घाला.
यानंतर, इलेक्ट्रिक स्विच बोर्ड साफ करण्यासाठी, तुम्हाला तीन चमचे अमोनिया पावडर, अर्धा कप पाणी, दोन चमचे लिंबाचा रस, क्लिनिंग ब्रश घ्यावा लागेल. या सर्व गोष्टी घेतल्यावर एका भांड्यात अमोनिया पावडर टाका.
त्यानंतर लिंबाचा रस आणि काही थेंब पाणी घालून घट्ट पिठ तयार करा. आता तुम्हाला ते द्रावण ब्रशने जुन्या स्विच बोर्डला लावावे लागेल. 5 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रशने स्विच बोर्ड पूर्णपणे स्वच्छ करा.
हे केल्यानंतर, तुम्हाला कापडाच्या मदतीने स्विच बोर्ड पूर्णपणे स्वच्छ करावा लागेल. अशा प्रकारे साफ केल्यानंतर तुमचा जुना स्विच बोर्ड पुन्हा नव्यासारखा चमकेल.