Maruti Recall : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण कंपनीने त्यांच्या एकूण 9125 गाड्या परत मागवल्या आहेत.
माहितीनुसार गाडीतील खराब सीट बेल्टमुळे कंपनीने हे पाऊल घेतले आहे. याआधीही कंपनीने त्यांच्या हजारो कार्स पार्ट मागवल्या होत्या. अशातच पुन्हा एकदा कंपनीने पुन्हा कार बोलावल्या आहेत. या गाड्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात सविस्तरपणे..
खराब सीट बेल्ट
मारुती सुझुकीने परत मागवलेल्या कार 2 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान तयार करण्यात आल्या आहेत. कंपनीच्या मतानुसार, समोरच्या सीटवर लावलेल्या सीट बेल्टमध्ये दोष आढळून असून प्रसंगी सीटबेल्टही उघडू शकते.
त्यासाठी ते दुरुस्त करण्यासाठी कंपनीने त्यांना परत बोलावले आहे. त्याचबरोबर यासाठी कंपनी कोणतेही पैसे घेणार नाही त्यासाठी सर्व कार खरेदीदारांशी कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे संपर्क करणार आहे.
मारुती सुझुकीने पाच वाहनांच्या एकूण 9125 युनिट्स परत मागवल्या आहेत. याआधीही कंपनीने डिझायर, वॅगनआर, इग्निस, सेलेरियो यांसारख्या गाड्या परत मागवल्या होत्या.