Driving license : आता ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय बिनधास्त चालवा कुठेही गाडी, फक्त करा ‘हे’ काम

Ahmednagarlive24 office
Published:

Driving license : आपल्या देशात दररोज कितीतरी अपघात होत असतात. यामध्ये काहींचा जीवही जातो. त्यामुळे केंद्र सरकारने वाहतुकीसंदर्भांत नियम खूप कडक केले आहेत.

तसेच दंडाच्या रक्कमेतही खूप वाढ केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स किंवा हेल्मेट नसेल तर आता हजारोंचे चलन कापले जाते. पंरतु, तुम्ही आता ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय बिनधास्त पाहिजे तिथे गाडी चालवू शकता.

अनेकांचे ड्रायव्हिंग लायसन्स असून ते घरीच विसरतात त्यामुळे चेकिंगदरम्यान पोलिस त्यांच्याकडून 5000 रु.पर्यंत चलन कापतात. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी गरजेचे आहे. जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स वैध असेल, तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी दाखवता येते.

दाखवा सॉफ्ट कॉपी

तुम्हाला पोलिसांनी अडवून ड्रायव्हिंग लायसन्स मागितले तर सॉफ्ट कॉपी दाखवून ड्रायव्हिंग लायसन्सचा पुरावा देता येतो. अनेकांना असा प्रश्न पडतो की सॉफ्ट कॉपी म्हणजे काय? तर सॉफ्ट कॉपी म्हणजे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची फोटो कॉपी ऑनलाईन असावी.

डिजीलॉकरमध्ये ठेवता येते सॉफ्ट कॉपी

ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी डिजीलॉकर या सरकारी अॅपमध्ये असली पाहिजे, ते वैध आहे. या अॅपचा वापर सरकारी कामांसाठी केला जातो.

तुम्ही या अॅप्लिकेशनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी ठेवू शकता त्यामुळे पोलिसांनी कुठेही अडवले तर तुम्ही ते चेकिंग दरम्यान दाखवू शकता आणि तुमच्या ड्रायव्हिंगचा पुरावा म्हणून दाखवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe