UIDAI issued Toll Free No : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक नवीन टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांचे आधार कार्डशी निगडित काम आता झटपट होणार आहे.
ही IVR तंत्रज्ञानावर आधारित सेवा आहे. त्यामुळे आता ग्राहकांना लवकरात लवकर आधार नोंदणी किंवा अपडेट स्थिती, पीव्हीसी कार्ड स्थिती किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळणार आहे.

ही 24×7 इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सेवा आहे, ज्यासाठी एखाद्याला कोणतेही तंत्रज्ञान माहित असणे गरजेचे नाही. आयव्हीआर हे एक तंत्रज्ञान आहे जे टेलिफोन वापरकर्त्यांना संगणकावर चालणाऱ्या टेलिफोन प्रणालीशी आवाजाद्वारे संवाद साधण्याची परवानगी देते. व्हॉइस वापरकर्त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते किंवा योग्य प्राप्तकर्त्याला कॉल फॉरवर्ड करते.
Experience new services built on #IVRS by UIDAI.
Residents can call the UIDAI toll-free number 1947, 24×7 to find out their Aadhaar enrollment or update status, PVC card status or to receive information via SMS.@GoI_MeitY @mygovindia @_DigitalIndia @PIB_India pic.twitter.com/bBV3LtuadF
— Aadhaar (@UIDAI) January 3, 2023
मिळणार चॅट सपोर्ट
वापरकर्त्यांसाठी आधार/पीव्हीसी कार्डची स्थिती ऑनलाइन तपासणे सोपे करण्यासाठी, UIDAI ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग आधारित चॅट सपोर्ट सुरू केला असून त्यामुळे आता ग्राहक अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतील आणि त्यांच्या शंकांचे थेट निराकरण करू शकतील.
#ResidentFirst #UIDAI’s New AI/ML based chat support is now available for better resident interaction!
Now Residents can track #Aadhaar PVC card status, register & track grievances etc.
To interact with #AadhaarMitra, visit- https://t.co/2J9RTr5HEH@GoI_MeitY @mygovindia pic.twitter.com/1qAWBogBnm
— Aadhaar (@UIDAI) January 2, 2023
तसेच केवळ आधार पीव्हीसी कार्डच्या स्थितीचा मागोवा घेण्यात मदत होणार नाही तर त्यांना तक्रारी नोंदवण्यात किंवा ट्रॅक करण्यासही मदत होणार आहे.