Ayushman Card : केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवत असते. त्यामुळे त्यांना खूप मदत होते. त्यापैकी एक म्हणजे आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना.
या योजनेचा अनेकजण लाभ घेत आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्रे आवश्यक आहेत. यामधील एक जरी कमी असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते

या कार्डद्वारे, कार्डधारकांना पॅनेलमधील रूग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात, ज्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलते. त्यामुळे कार्डधारकांना एकही रुपया खर्च करावा लागतो.
असावीत ही कागदपत्रे
नंबर 1
जर तुम्हाला या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार नसेल तर तुमचा अर्ज अडकू शकतो.
नंबर 2
तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवायचे असेल, तर अर्जाच्या वेळी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्रही संबंधित अधिकाऱ्याला दाखवावे लागणार आहे. पण तुमच्याकडे नसेल तर तुमचा अर्ज अडकू शकतो.
नंबर 3
आयुष्मान कार्ड मिळविण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड आणि एक सक्रिय मोबाइल नंबर देखील असावा. यापैकी कोणतेही कागदपत्र नसेल तर तुमचा अर्ज अडकू शकतो.