Indian Railways : देशातील अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने काही नियम कडक केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेल्वेत विनाकारण अलार्म साखळी ओढणे हा कायदेशीर अपराध मानण्यात येतो. रेल्वेत असणाऱ्या अलार्मचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीतच करतात.
परंतु, सध्या अनेकजण अशी कृती करतात. आता प्रवाशांना असे करणे महागात पडू शकते. कारण आरोप सिद्ध झाल्यास आर्थिक दंडासोबतच त्या व्यक्तीला अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ही अलार्म साखळी कधी खेचायची असते जाणून घेऊयात.

प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाचे मूल स्टेशनवर मागे राहिले तर प्रवासी रेल्वेची अलार्म चेन ओढू शकतो. तसेच रेल्वेमध्ये आग लागली असेल तर तुम्ही रेल्वेची अलार्म चेन खेचू शकता.
रेल्वेमध्ये वृद्ध किंवा अपंग व्यक्ती चढत असेल आणि जर रेल्वे धावू लागली तर तुम्ही रेल्वेची अलार्म चेन खेचू शकतारेल्वेच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला खूप ताप आला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल तर तुम्ही रेल्वेची अलार्म खेचू शकता.
तसेच रेल्वेमध्ये चोरी किंवा दरोडा पडला असेल तर तुम्ही रेल्वे चेन खेचू शकता. जर तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वे अलार्म चेन पुलिंगच्या या नियमांबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे.
प्रवासादरम्यान रेल्वे थांबवण्यासाठी चेन पुलिंग करत असाल तर तो मोठा गुन्हा आहे. कारण तुम्ही दोषी आढळला तर तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.