Smartphone Charging Tips : स्मार्टफोन वापरकर्त्यांनी स्मार्टफोन वापरण्यापूर्वी तो कसा वापरावा त्याची निगा कशी निगा राखावी याची माहिती घ्यावी. कारण सध्या स्मार्टफोनचे स्फोट होण्याच्या घटना वाढत आहेत. अनेकांनी तर यामध्ये आपले प्राण गमावले आहेत.
जर तुम्हीही स्मार्टफोन वापरत असाल तर सर्वप्रथम तो चार्ज किती करावा? तसेच कोणता चार्जर तुमच्या स्मार्टफोनसाठी योग्य आहे ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट झालाच म्हणून समजा.

रात्रभर फोन चार्ज करणे टाळा
जर इतरांप्रमाणे तुम्हीही स्मार्टफोन रात्रभर चार्ज करत असाल तर आत्ताच सावध व्हा. कारण जर तुम्ही रात्रभर फोन चार्ज करत असाल तर तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब होते. तुम्ही अशी अनेक प्रकरणे पाहिली असतीलच.
मूळ चार्जर वापरा
बाजारात तुम्ही अनेक प्रकारचे स्थानिक चार्जर पाहिले असतील. अनेकजण त्यांचा मूळ चार्जर हरवला किंवा खराब झाला तर लोक स्थानिक चार्जर खरेदी करतात. तसेच स्थानिक चार्जर फोनला बराच वेळ चार्ज करतो त्यामुळे बॅटरी गरम होऊन ती लवकर खराब होते.
क्षमता तपासणे गरजेचे
अनेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनसोबत चार्जर देत नाहीत. त्यामुळे फोनची क्षमता पाहुन चार्जर खरेदी करा. जर तुम्ही असे केले नाही तर स्मार्टफोनच्या बॅटरीवर दाब पडतो तसेच प्रक्रियेचा वेगही कमी होतो. त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नका, नेहमी स्मार्टफोनची क्षमता असणारा चार्जर खरेदी करा.
कधी चार्ज करावा स्मार्टफोन?
फोन सतत चार्ज केला तर त्याच्या बॅटरीवर दबाव येतो. त्यामुळे फोनची बॅटरी २० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तेव्हाच फोन चार्ज करा. जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्या फोनच्या बॅटरीवर कोणता ताण येणार नाही तसेच बॅटरी लवकर खराब होणार नाही.