Rooftop Solar Programme : अरे व्वा.. ! अवघ्या 500 रुपयांत तुमचे वीज बिलाचे झंझट होईल दूर, असा करा या योजनेसाठी अर्ज

Ahmednagarlive24 office
Updated:

Rooftop Solar Programme : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून या दिवसात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या दिवसात कितीही प्रयत्न केले तर वीजबिल कमी होत नाही. प्रत्येकालाच आपले वीजबिल कमी यावे असे सगळ्यांना वाटत असते.

त्यासाठी आता केंद्र सरकारने एक योजना सुरु केली आहे. सौरऊर्जेला चालना मिळवी यासाठी सरकार रूफटॉप सोलर स्कीम अंतर्गत सबसिडी देत आहे आणि आता तुम्ही सहज या योजनेसाठी अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त एकदा तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवले की, तुमची वीज बिलातून सुटका होईल.

काय आहे रूफटॉप सोलर योजना

ही एक विशेष प्रकारची योजना असून जी भारत सरकार आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून संयुक्तपणे सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, लाभार्थ्याला छतावर 3KW पर्यंत सौर रूफटॉप पॅनेल बसविण्यासाठी 40 टक्के पर्यंत सरकारी अनुदान देण्यात येते, तर जर व्यक्तीने 3KW ते 10KW पर्यंतचे सौर रूफटॉप त्याच्या छतावर बसवल्यास तुम्हाला सरकारकडून 20 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. हे लक्षात घ्या की या सबसिडी योजनेत 5 ते 6 वर्षात खर्च देण्यात येतो. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या वीज कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

असा करा अर्ज?

सर्वात अगोदर, तुम्हाला http://Solarrooftop.gov.in वर जावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही वीज कंपन्यांच्या वेबसाइटवर ग्राहक क्रमांक टाकताच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. आता आवश्यक लोड, फोटो, ओळखपत्र आणि वीजबिल अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क 500 रुपये जमा करून तुमच्या अर्जावर प्रक्रिया केली जाणार आहे. आता पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला वीज कंपनीमध्ये सूचीबद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही एका विक्रेत्याची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर एजन्सीने जागेची पाहणी केल्यानंतर तुम्हाला सोलर प्लांट उभारण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. वेबसाइटवर संपूर्ण प्रक्रियेचा मागोवा घेतला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe