Jyotish Tips : शनीदेवाची साडेसाती ही प्रत्येकासाठीच चांगली नसते. शनिदेव ज्या लोकांच्या कुंडलीत अशुभ घरात बसलेले असतात, त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत राहतात. शनिदेवाची काही राशींवर कृपादृष्टी असल्यास या साडेसातीचा काही राशींवर फारसा परिणाम होत नाही.
तुम्हाला आता तुमच्यावर शनिदेवाची कृपा आहे की नाही ते सहज समजू शकते. जर तुमच्यावर शनिदेव प्रसन्न असेल तर तुम्हाला काही संकेत मिळतात. संकेतांवरून तुमच्यावर शनिदेवाची कृपा आहे की नाही ते कळते.
असतात हे संकेत
1. स्वतःहून एखादी समस्या सोडवणे – समजा तुम्ही एखाद्या समस्येत अडकला असाल तर लवकरच आणि काही चमत्कारिक मार्गाने तुमची समस्या दूर होत असेल, तर असे समजून घ्या की तुमच्यावर शनिदेवाची कृपा आहे.
2. आरोग्य – जर तुमचे खराब आरोग्य आपोआप ठीक होत असल्यास किंवा तुम्ही आजारी पडत नसल्यास ते शनिदेवाच्या कृपेमुळे झाले आहे असे समजावे.
3. पादत्राणे चोरीला जाणे – जर शनिवारी तुमचे बूट किंवा चप्पल चोरीला गेल्यास ते शुभ मानले जाते, या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते.
4. रास – जर तुमच्या राशीचा स्वामी शनि असल्यास शनिदेवाची तुमच्यावर कृपा असते. मकर, कुंभ, तूळ या राशींवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो.
5. तुमची वागणूक – जर तुमचे वागणे इतरांसाठी चांगले असल्यास जर तुमच्या मनात दया असल्यास, जर तुम्ही गरीब लोकांना मदत केल्यास अशा लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात.
6. तुमच्यासोबत इतरांचे वागणे – जर तुमच्यासोबत काम करणाऱ्याचे वागणे चांगले असल्यास शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहे असे मानावे.
7. धन लाभ – तुम्हाला अचानक धनलाभ होत असल्यास शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असण्याचे लक्षण आहे.