Amazon Sale : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक एसी खरेदी करत आहेत. अशातच मागणी जास्त असल्याने या एसींची किंमत खुप जास्त आहे. परंतु तुमच्याकडे खूप कमी किमतीत एसी खरेदी करण्याची संधी आहे.
अशी भन्नाट संधी तुम्हाला ऍमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये मिळत आहे. या ठिकाणी तुम्हाला Voltas, LG, Samsung चे AC 50% च्या सवलतीत मिळत आहेत. मात्र तुम्हाला या संधीचा लाभ लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. कारण अशी ऑफर उद्याच्या दिवसासाठी असणार आहे.

Samsung Convertible 5-in-1 AC
कंपनीचा हा AC 43% च्या सवलतीनंतर 34,990 रुपयांना मिळत आहे. या एसीची मूळ किंमत ६०,९९० रुपये इतकी आहे. Amazon यावर 1,500 रुपयांचे अतिरिक्त डिस्काउंट कूपन देण्यात येत असून कंपनीच्या या स्प्लिट एसीची क्षमता 1.5 टन इतकी असून 3-स्टार एनर्जी रेटिंग आहे. फीचर्सचा विचार केला तर कंपनीने यात कॉपर कंडेन्सर कॉइल, व्हेरिएबल स्पीड इन्व्हर्टर कंप्रेसर, ऑटो-क्लीन फीचर आणि अँटी-बॅक्टेरियल फिल्टर देण्यात आले आहे.
LG AI ड्युअल इन्व्हर्टर AC
तर 40% च्या सवलतीनंतर, कंपनीच्या या एसीची विक्री 45,490 रुपयांना केली जात आहे. या एसीची मूळ किंमत 75,990 रुपये इतकी आहे. LG AI ड्युअल इन्व्हर्टर 1.5 टन स्प्लिट एसी मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी ठीक असून हा एसी 4-वे एअर स्विंग, 6 भिन्न मोड, अँटीव्हायरस संरक्षण तसेच स्मार्ट निदान प्रणालीला समर्थन देत आहे. इतकेच नाही तर 100% तांबे कंडेन्सरने हा एसी सुसज्ज आहे.
व्होल्टास वेक्ट्रा प्रिझम एसी
या Voltas AC वर 50% सवलत देण्यात येत आहे, त्यानंतर तो 32,990 रुपयांना खरेदी करता येत आहे, या एसीची मूळ किंमत 65,990 रुपये इतकी आहे. व्होल्टासचा हा 3-स्टार एसी इन्व्हर्टर कंप्रेसर आणि कॉपर कंडेन्सर कॉइलसह येत आहे. हा स्प्लिट एसी 4 कूलिंग मोड, 52 डिग्री सेल्सिअस अॅम्बियंट कूलिंग तापमानास अँटी-डस्ट तसेच अँटीमाइक्रोबियल फिल्टर्ससह सपोर्ट करेल.
हायर स्प्लिट एसी
कंपनीच्या या एसीची Amazon सेलमध्ये 50% डिस्काउंटनंतर किंमत 31,990 रुपये आहे. या एसीची मूळ किंमत 64,000 रुपये इतकी आहे. या 1.5 टन स्मार्ट एसीमध्ये सेल्फ-क्लीन फीचर कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी देण्यात आले असून ते 3-स्टार एनर्जी रेट केले आहे. हा एसी वाय-फाय तसेच व्हॉईस कंट्रोल या दोन्हींना सपोर्ट करेल त्याचा एअरफ्लो 20 मीटर आहे. या एसीमध्ये 100% कॉपर कंडेन्सर कॉइलसह डार्क मोड देण्यात आला आहे.
Lloyd 5 in 1 convertible AC
कंपनीच्या या AC ची समर सेलमध्ये 46% च्या सवलतीत विक्री केली जात आहे. तर डिस्काउंटनंतर हा एसी 31,999 रुपयांना उपलब्ध आहे. या एसीची मूळ किंमत 80,890 रुपये इतकी आहे. हा एसी 160 चौरस फुटांपर्यंतच्या खोल्यांसाठी योग्य असून या एसीला 3-स्टार एनर्जी रेटिंग देण्यात येत आहे. ब्लू फिन्स बाष्पीभवन कॉइलने सुसज्ज असून हा एसी टू-वे एअर स्विंगला सपोर्ट करेल. यात छुपा एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.