iQOO Neo 7 5G : मस्तच.. iQOO च्या या शानदार फोनवर होणार 21700 रुपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या किंमत

Published on -

iQOO Neo 7 5G : काही दिवसांपूर्वी iQOO Neo 7 5G हा फोन लाँच झाला आहे. या फोनमध्ये कंपनीने शानदार फीचर्स दिले आहेत. 34,999 रुपयांच्या किमतीसह तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. मात्र तुमच्याकडे हाच फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

Amazon च्या समर सेलमध्ये तुम्हाला ही संधी मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आता डिस्काउंटनंतर हा फोन 28,999 रुपयांना खरेदी करू शकता. इतकेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल परंतु त्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असावा.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीचा हा फोन 8 GB + 128 GB आणि 12 GB + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. यात कंपनीकडून डायमेंशन 8200 5G प्रोसेसर दिला जात आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला यात 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. हा 1200Hz च्या इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेटसह येत असून फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले जात आहेत.

यात 2-मेगापिक्सलचा बोकेह आणि 64-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर दिला जात आहे. तर सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. या फोनच्या मुख्य कॅमेऱ्याची खासियत म्हणजे तो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येत आहे.

यातील बॅटरी 5000mAh असून जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करेल. इतकेच नाही तर कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 2.4G, 5G, Bluetooth 5.3, USB Type-C पोर्ट आणि GPS सारखे पर्याय दिले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe