Maharashtra Bajarbhav :सोयाबीन व कांद्यानंतर आता टॉमेटोदेखील बळीराजाला रडवतोय, अशी परिस्थिती आहे. सध्या टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे अनेक भागांत नगदी पीक म्हणून टॉमेटोला पसंती दिली जाते.
अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकऱ्यांचा झालेला खर्चसुद्धा निघत नाही.
कारण टोमॅटो पिकाला औषध फवारणी, बांधणी, मल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रुपये खर्च करूनही टोमॅटो दोन रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी नेली असता त्याचा खर्चसुद्धा निघत नसून शेतकऱ्यांना पैसे भरावे लागतात.
टोमॅटो झाले कवडीमोल गेली दोन-तीन वर्षे टोमॅटो पिकामध्ये शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पूर्वी नगदी पीक म्हणून टोमॅटो ओळखला जात होता. परंतु हल्ली कोणत्याही कारणाने टोमॅटो दर मिळत नाही.
या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. तसेच काळजीही घ्यावी लागते. दर न मिळाल्याने मोठे कर्ज शेतकऱ्यांच्या अंगावर येते. टोमॅटो हे नाशवंत पीक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही तरीदेखील परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटो शेतात तोडणी बंद केली आहे.
त्यामुळे शेतात टोमॅटोंचा खच पडला आहे. शेतकऱ्यांना पहिल्या आठवड्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, गेल्या दोन दिवसांत कांद्याचेही बाजारभाव उतरल्याने कांद्याबरोबर टोमॅटोनेही शेतकऱ्यांना रडवले.
प्रतीक्रेटस सरासरी २० ते ४० दर मिळत असून माल नेण्याचे भाडे ४५ ते ५० रुपये त्यात तोलाई, वाराई, हमाली जाते तर शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणीसाठी २० रुपये प्रती क्रेटस खर्च येतो म्हणजे टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठीची ५० ते ६० रुपये खर्च येतो तेवढाच भाव मिळत असल्यामुळे बाकीचा खर्च घरातून टाकण्याची वेळ आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली.
सोयाबीन – सोयाबीनला बाजार भेटेल या अपेक्षेने सोयाबीन केला पण बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळेच उत्पादन खर्च निघाला नाही. कांदा – शेतकयांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली; परंतु कांद्याचीदेखील तीच अवस्था पाच ते सहा रुपये किलो कांदा विक्री करण्याची वेळ आली. उत्पादन खर्चात मात्र वाढ झाली. नफा झाला नाही, मात्र कर्जाचा डोंगर वाढला. शेतकरी कोणत्याही पिकाला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आणखीच अडचणीत सापडला आहे.