7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
सध्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर आहे. मात्र केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांचा DA पुन्हा एकदा ४ टक्क्यांनी वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर जाऊ शकतो.

७ व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोन वेळा वाढवण्यात येतो. मात्र २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांचा DA मार्च महिन्यामध्ये एकदाच वाढवण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा सध्या DA ४२ टक्के आहे.
दरवर्षी कर्मचाऱ्यांना DA दार सहा महिन्यांनी वाढवण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून DA वाढीची भेट दिली जाते. मात्र यावर्षी कर्मचाऱ्यांचा DA मार्च महिन्यामध्ये वाढवण्यात आला आहे. तसेच आता जुलै महिन्यात नाही तर ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांना DA वाढ मिळू शकते.
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या DA वाढीचा लाभ मिळणार आहे. DA वाढीसह कर्मचाऱ्यांना डीआर वाढीचा देखील फायदा मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
डीए आणि डीआरमध्ये बंपर वाढ होईल
केंद्र सरकार लवकरच देशातील सुमारे 1.75 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढ आणि डीआर वाढीची भेट देऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या पुढील महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४२ वरून ४६ टक्के होईल. त्यानुसार केंद्रीय कर्मचार्यांचा पगार वार्षिक 8000 ते 27,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
एचआरए भत्ता वाढू शकतो
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना DA आणि DR वाढीसोबत घरभाडे भत्ता वाढ देखील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जुलै 2021 मध्ये कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घरभाडे भत्ता वाढीचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.