Maruti Suzuki Ciaz : स्वस्तात खरेदी करता येईल मारुतीची ‘ही’ डॅशिंग सेडान! मिळेल 20 kmpl चे मायलेजसह सेफ्टी फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Maruti Suzuki Ciaz

Maruti Suzuki Ciaz : मारुती सुजूकीच्या अनेक कार्स बाजारात धुमाकूळ घालत असतात. कंपनी आपल्या सर्वच कारमध्ये शानदार फीचर्स आणि मजबूत सेफ्टी फीचर्स देत असते. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्या खूप जास्त आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने आपली Ciaz ही डॅशिंग सेडान कार लाँच केली होती. या कारमध्ये तुम्हाला 20 kmpl चे मायलेज मिळेल. त्याशिवाय शक्तिशाली इंजिनदेखील तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कार तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल.

510 लिटर बूट स्पेस

मारुतीच्या या जबरदस्त कारला 510 लिटरची मोठी बूट स्पेस मिळत आहे. इतकेच नाही तर लक्झरी आणि सर्व अत्याधुनिक फीचर्स या कारमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. किमतीबद्दल बोलायचे झाले तर 9.30 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत ही शानदार कार तुम्हाला खरेदी करता येईल. ही एक पूर्ण आकाराची सेडान कार असल्याने तुम्हाला ती अरुंद ठिकाणी सहज चालवता येईल.

मिळेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय

मारुतीच्या सियाझमध्ये 1462 cc चे शक्तिशाली इंजिन दिले आहे. या जबरदस्त कारमध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन दिले आहे. ही डॅशिंग सेडान कार असून ती 20 kmpl चा उच्च मायलेज देते. या हाय क्लास कारमध्ये 103.25 Bhp ची पॉवर तुम्हाला पाहायला मिळेल.

येईल चार ट्रिममध्ये खरेदी करता

सध्या या कारचे सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा असे चार ट्रिम बाजारात उपलब्ध आहे. याचे टॉप मॉडेल 12.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात उपलब्ध असून यात आकर्षक अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक्स तुम्हाला पाहायला मिळतील.

कलर पर्याय

प्रवाशांच्या सेफ्टीसाठी या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड-सीट अँकरेज, मागील पार्किंग सेन्सर्स देण्यात आली आहेत. यामध्ये सात मोनोटोन रंगांमध्ये आणि तीन ड्युअल टोन रंग उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय यात ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह स्वयंचलित एलईडी हेडलाइट्स, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला मिळेल.

स्पर्धा

कंपनीच्या या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट आणि क्रूझ कंट्रोलसह पॅसिव्ह कीलेस एंट्री मिळते. मार्केटमध्ये ही कार स्कोडा स्लाव्हिया आणि फोक्सवॅगन वर्ट्सला टक्कर देते. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) सारखी जबरदस्त फीचर्स दिली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe