Numerology Mulank 1 : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, जीवनातील चढ-उतार आणि भविष्य निश्चित केले जाते. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
एखाद्या व्यक्तीची राशीनुसार कुंडली कशी सांगितली जाते. त्याचप्रमाणे अंकशास्त्र व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार काढलेले मूलांक त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, वागणूक आणि भविष्याची माहिती देते.
अंकशास्त्रात, जन्मतारखेचे अंक जोडून मिळालेल्या मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दलच्या गोष्टी निश्चित केल्या जातात. आकड्यांनुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवरून जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि घटनांची माहिती मिळते.
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांबद्दल सांगणार आहोत. या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 आहे आणि त्या आधारावर आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती देणार आहोत. चला तर मग…
मूलांक 1 असणारे लोक कसे असतात?
-मूलांक 1 असणाऱ्या लोकांवर सूर्य देवाचा आशीर्वाद आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या लोकांमध्ये उत्कृष्ट नेतृत्व क्षमता असते. या व्यक्ती प्रत्येक कामात पुढे असतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याचे अंगभूत गुण असतात.
-या लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही. किंवा त्यांना कोणाचीही गुलामी करायला आवडत नाही. त्यांना स्वतःसाठी मार्ग तयार करणे आवडते. ते नेहमीच स्वतःचे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात.
-हे लोक कशालाही घाबरत नाहीत आणि निर्भयपणे प्रत्येक गोष्टीला सामोरे जातात. साहसी स्वभावामुळे ते प्रत्येक काम अगदी सहजतेने करतात. या लोकांमध्ये कोणतेही भय नसते, म्हणूनच ही लोकं कोणतेही काम सहजतेने पार पडतात.
-या लोकांच्या स्वभावात थोडासा स्वार्थ असतो, त्यामुळे या लोकांना स्वार्थी म्हंटले जाते. पण हा स्वार्थी स्वभावच त्यांना जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देऊन यशस्वी व्यक्ती बनवतो.
-या लोकांची आर्थिक स्थिती नेहमीच चांगली राहते. या लोकांना कशाचीही कमी जाणवत नाही. आर्थिक चढ-उतारानंतर ते स्वतःच सर्वकाही संतुलित करतात.
-या लोकांना अभिमानाने जगणे आवडते. यामुळेच ते यावर भरपूर पैसा खर्च करतात. हे लोक खूप स्वाभिमानी देखील असतात.
-हे लोक प्रेमसंबंधांच्या बाबतीत वरून कठोर दिसतात पण आतून अतिशय नम्र आणि गोड असतात. त्यांचे नाते कायम टिकते. किंवा ही लोकं त्यांचे नाते टिकवून ठेवतात.