Peanut Butter : पीनट बटर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. यात पोटॅशियम, जस्त, सेलेनियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि लोह यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. म्हणूनच तज्ञ देखील याचा आहारात समावेश कण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही एक चमचा पीनट बटर सकाळच्या नाश्त्यात किंवा रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत किंवा ब्राऊन ब्रेडवर लावून त्याचे सेवन केले तर तुम्हाला त्याचे खूप फायदे जाणवतील. आजच्या या लेखात आपण याच्या फायद्यांबद्दलच जाणून घेणार आहोत. चला तर मग…
पीनट बटर खाण्याचे फायदे :-
-आजकाल मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही डोळ्यांशी संबंधित अनेक आजार जाणवतात. त्यामुळे लहान वयातच मुले चष्मा घालू लागतात. याचे एक सामान्य कारण म्हणजे पोषणाचा अभाव आणि फोन, लॅपटॉप इत्यादींचा अतिवापर. यामुळे बऱ्याच लोकांचे हळूहळू डोळे खराब होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन-ए ने समृद्ध असलेल्या पीनट बटरचे सेवन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
-शरीरात एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत, दररोज एक चमचा पीनट बटरचे सेवन खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत करते. यासोबतच वजन कमी करण्यात देखील मदत करते. पीनट बटरचा वापर हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
-तुमची पचनक्रिया चांगली असेल तर अनेक आजार तुमच्या जवळही येणार नाहीत. तुमचे आतडे निरोगी ठेवण्यात फायबर महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात फायबरयुक्त पीनट बटरचा समावेश केल्यास पचनक्रिया मजबूत राहते. आणि तुम्ही लवकर कोणत्याही आजाराला बळी पडत नाही.
-रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज एक चमचा पीनट बटरचे सेवन करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. कारण पीनट बटरमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.