Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप काही जाणून घेता येते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये, व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवर तयार झालेल्या संख्येच्या आधारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य निश्चित केले जाते. 0 ते 9 पर्यंतच्या संख्येच्या गणनेच्या आधारे सर्व गोष्टी ज्ञात आहेत. उदारहणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 9 असेल. त्याचप्रमाणे सर्व तारखा जोडल्या जातात. आजच्या या लेखात आपण मूलांक 7 क्रमांकाच्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
-या मूलांकाचे लोक खूप भाग्यवान मानले जातात, या व्यक्तींवर सदैव कुबेर देवाची कृपा असते, असे म्हणतात. हे लोक स्वतंत्र आणि शक्तिशाली विचारांचे असतात, ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे मालक असतात आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ते यश मिळवून अमाप संपत्ती कमवतात. त्यांच्याकडे कल्पनाशक्ती मजबूत असते, तेसच हे व्यक्ती प्रवासाबद्दल नेहमीच उत्सुक असतात.
-हे लोक दृढनिश्चयी स्वभावाचे असतात आणि त्यांनी एकदा काम करायचे ठरवले की ते ते पूर्ण करू शकतात आणि काहीही करून यश मिळवू शकतात. ते कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात आणि उच्च पदे प्राप्त करतात. त्याचबरोबर काही लोक राजकारणातही चांगले करिअर करतात.
-आपले म्हणणे कोणासमोरही उघडपणे मांडण्याची या लोकांमध्ये क्षमता असते. हे निर्भय आणि निष्पक्ष असल्यामुळे ते आपला दृष्टिकोन सर्वांसमोर ठेवतात आणि खूप आत्मविश्वासाने असतात. या लोकांमध्ये एका वेळी एकापेक्षा जास्त काम करण्याची क्षमता असते.
-ज्या कुटुंबात मूलांक 7 चे लोक जन्माला येतात त्या कुटुंबाचे नशीब बदलते. त्याच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि समृद्धी नांदते. असेही म्हणता येईल की ते त्यांच्या कुटुंबासाठी शुभेच्छा आणतात.
-मूलांक 7 च्या लोकांची अभिव्यक्ती क्षमता चांगली आहे, परंतु त्यांना लहान गोष्टी मोठ्या करण्याची सवय आहे. मल्टीटास्किंगमुळे ते कधीकधी चिडचिडही होतात. ते स्वभावाने अतिशय साधे आहेत आणि त्यांना समाजात खूप मान मिळतो.