Vivo Smartphone Offer : स्वस्त झाले Vivo चे ‘हे’ सर्वाधिक विक्री करणारे फोन, लगेचच करा ऑर्डर

Ahmednagarlive24 office
Published:
Vivo Smartphone Offer

Vivo Smartphone Offer : सर्वच स्मार्टफोन प्रत्येकाच्या बजेटमध्ये असतातच असे नाही. काहीजण बजेट कमी असल्याने कमी किमतीत उपलब्ध असणारा स्मार्टफोन खरेदी करतात. परंतु आता तुम्ही सर्वाधिक विक्री करणारे फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

Vivo ने आपल्या दोन स्मार्टफोनची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांची हजारोंची बचत होईल. विशेष म्हणजे कंपनीने हे स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी लाँच केले आहेत. लगेचच स्वस्तातले स्मार्टफोन ऑर्डर करा. जाणून घेऊयात सविस्तर ऑफर.

सवलतीनंतर किंमत

आता तुम्हाला Vivo Y36 एकूण 15,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येत असून लॉन्चच्या वेळी त्याची किंमत 16,999 रुपये इतकी होती.

हा फोन तुम्हाला आणखी स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनी निवडक बँक कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 1,000 रुपये कॅशबॅक ऑफर करत आहे. यात ICICI बँक, SBI बँक, OneCard, येस बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC बँक, फेडरल बँक आणि IndusInd बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या की ही ऑफर ICICI बँक डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर वैध आहे.हा फोन तुम्ही 14,999 रुपयांना सहज खरेदी करू शकता, परंतु ऑफर फक्त 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

Vivo Y02t वर कोणतीही बँक ऑफर नसून तो 9,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 9,999 रुपये इतकी होती. फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह कॉन्फिगरेशनमध्ये येतो. कंपनीचे हे दोन्ही स्मार्टफोन तुमच्यासाठी Amazon India आणि Vivo च्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जाणून घ्या Vivo Y36 4G चे फीचर्स

कंपनीच्या या फोनमध्ये 6.64-इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. तो टीयरड्रॉप नॉच, फुल एचडी प्लस रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येत आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर काम करेल यात फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. त्याशिवाय 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट दिला आहे. हा फोन Android 13 वर आधारित FuntouchOS 13 वर काम करेल.

तर फोटोग्राफीसाठी, यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा बोकेह लेन्स दिली आहे. तर सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. कंपनीचा फोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो. हा फोन व्हायब्रंट गोल्ड आणि मेटिअर ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.

Vivo Y02t चे फीचर्स

या मध्ये 6.51-इंचाचा LCD डिस्प्ले आहे असून तो HD+ रिझोल्यूशन, टीयरड्रॉप नॉचसह येतो. MediaTek Helio P35 प्रोसेसरवर हा फोन काम करतो. तर स्टोरेजचा विचार केला तर यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिले आहे, यात 4GB व्हर्च्युअल रॅमचाही सपोर्ट असून फोन Android 13 वर आधारित FuntouchOS 13 वर काम करतो.

या फोनमध्ये फ्लॅशसह 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला असून सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करत असून ग्राहकांना तो कॉस्मिक ग्रे आणि सनसेट गोल्ड रंगांमध्ये खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe