Smart TV Offer : जर तुम्ही कमी किमतीत शक्तिशाली फीचर्स असणाऱ्या स्मार्टटीव्हीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. फक्त संधीचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की, काही दिवसांसाठी ही ऑफर असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर टीव्ही खरेदी करा.
Amazon तुमच्यासाठी जबरदस्त सवलत घेऊन आले आहे. ज्यामुळे तुम्हाला मूळ किमतीपेक्षा निम्म्या किमतीत 55 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करता येतील. यामध्ये सॅमसंग आणि सोनीच्या स्मार्ट टीव्हीचा समावेश आहे. त्वरित जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

Samsung 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट QLED TV QA55Q80BAKLXL
किमतीचा विचार केला तर सॅमसंगच्या या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 1,61,900 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही Amazon डीलमध्ये 51% सवलत देऊन सहज खरेदी करू शकता. तसेच बँक ऑफरसह, तुम्हाला या स्मार्टटीव्हीची किंमत आणखी 1500 रुपयांनी कमी करता येईल.
त्याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला हा टीव्ही 2550 रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरसाठी तुमचा जुना टीव्ही उत्तम स्थितीत असावा. इतकेच नाही तर हा टीव्ही केवळ 3841 रुपयांच्या EMI वर तुम्ही खरेदी करू शकता.
याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा टीव्ही 55-इंचाच्या 4K QLED पॅनेलसह येत आहे. तर त्याचा रिफ्रेश दर 100Hz इतका आहे. यात शक्तिशाली आवाजासाठी डॉल्बी अॅटमॉससह सराउंड साउंड दिला आहे. तर कंपनी Netflix, Prime Video, Zee5, Sony Liv आणि YouTube सारखे इन-बिल्ट अॅप्स देखील देत आहे.
सोनी ब्राव्हिया 55 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी Google TV KD-55X74K
हा स्मार्टटीव्ही तुम्ही 44% सवलतीत खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत 99,900 रुपये इतकी आहे. परंतु या शानदार सेलमध्ये, 55,990 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर हा टीव्ही खरेदी करू शकता. यात बँक ऑफरमध्ये टीव्हीवर 2,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे. EMI 2688 रुपयांपासून सुरू होतो.
यात तुमच्यासाठी 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे. जो 178 डिग्रीच्या वाइड व्ह्यूइंग अँगलसह येतो. शिवाय यामध्ये शक्तिशाली आवाजासाठी, ओपन बॅफल स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओसह 20 W साउंड आउटपुट दिले आहे. तर या गुगल टीव्हीमध्ये क्रोमकास्ट देत आहे. यामध्ये तुम्हाला प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्ससह Apple Airplay आणि Alexa सपोर्ट मिळत आहे.