IRCTC Tour Package : पर्यटनाला चालना देण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC देशांतर्गत आणि परदेशातील टूरसाठी टूर पॅकेजेस सुरू करत आहे. या पॅकेजअंतर्गत पर्यटकांना कमी खर्चात कुठेही फिरत येते.
असेच एक टूर पॅकेज इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ने आणले आहे. ज्या अंतर्गत तुम्हाला अयोध्या, काशी, प्रयागराज, बौद्ध गया आणि सारनाथ या ठिकाणांना भेट देता येईल. याबाबत IRCTC ने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
IRCTC ने नवीन वर्ष 2024 च्या निमित्ताने तुमच्यासाठी एक अतिशय किफायतशीर आणि अप्रतिम टूर पॅकेज आणलेले आहे. तुम्हालाही नववर्षानिमित्त धार्मिक स्थळांना भेट द्यायची असल्यास तुमच्यासाठी अयोध्या, काशी, प्रयागराज, बौद्ध गया आणि सारनाथ या ठिकाणांना भेट देण्याची शानदार संधी आहे.
याबाबत IRCTC ने सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या टूर पॅकेजची माहिती देण्यात आली आहे IRCTC ने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, हे पॅकेज 31 डिसेंबर 2023 आणि त्यानंतर 21 जानेवारी 2024 ला सुरू होणार आहे.
असे करा तिकीट बुक
IRCTC च्या मतानुसार, 6 रात्री आणि 7 दिवसांचे टूर पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. या अंतर्गत सीट बुकिंग फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर होईल. आता तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट http://www.irctctourism.com ला भेट देऊन या टूर पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WMA64 या लिंकवरून या टूर पॅकेजसाठी थेट जागा बुक करता येईल.
जर तुम्हाला काही अडचण आली तर 827931660 या क्रमांकावर कॉल करून मदत घेऊ शकता. त्याशिवाय टूर पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वर देखील माहिती मिळेल.
खर्च
जर तुम्हाला ही सहल एकट्याने करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 68,100 रुपये मोजावे लागणार आहेत. समजा दोन लोकांसोबत प्रवास करायचा असल्यास तर तुम्हाला प्रति व्यक्ती 40,200 रुपये मोजावे लागणार आहेत. तर तीन लोकांसोबत प्रवास करायचा असेल तर प्रति व्यक्ती 34,700 रुपये मोजावे लागणार आहेत. मुलांसाठी 27,400 रुपये खर्च करावे लागणार आहेत.