Jyotish Tips : ग्रहांच्या उलथापालथीमुळे राशीचक्रावर मोठा परिणाम होत असतो. दरम्यान, पुढील महिन्यामध्ये ग्रहांची खूप उलथापालथ होणार आहे. मेष राशीतील गुरु चांडाळ योग संपुष्टात येऊन महिन्याच्या सुरुवातीला तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतुची युती तयार होणार आहे.
यापूर्वी मेष राशीत मंगळ-राहुची युती झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचे विपरीत परिणाम दिसले होते. 3 ऑक्टोबरला मंगळ ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. या राशीत केतु आधीच आहे. ही युती 30 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.

मकर रास
मकर रास असणाऱ्या लोकांसाठी केतू-मंगळाचा योग खुप फायदेशीर आहे. या काळात मंगळ आणि केतूचा शुभ प्रभाव प्राप्त होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप यश मिळू शकते. सोबतच या दरम्यान तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त, या दरम्यान, घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता जास्त आहे. तुमचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल.
सिंह रास
ज्योतिषीय गणनेनुसार, सिंह राशीच्या तिसऱ्या घरामध्ये मंगळ-केतूचा संयोग होत असून अशा स्थितीत हे संयोजन खूप शुभ सिद्ध होणार आहे. इतकेच नाही तर या काळात शौर्य वाढत जाईल. या योगाच्या शुभ प्रभावामुळे जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना खूप मोठा आर्थिक लाभ होईल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप संधी मिळतील. त्याशिवाय या काळात या राशीच्या लोकांच्या उत्पन्नातदेखील कमालीची वाढ होईल.
कन्या रास
कन्या रास असणाऱ्या लोकांसाठी केतू-मंगळाचा युती खूप फायदेशीर आहे. खरे तर या काळात मंगल देवाच्या कृपेने संपत्तीत वाढ होणार आहे. तुम्ही करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. इतकेच नाही तर कुटुंबाशी निगडीत प्रत्येक प्रकरणाचा निपटारा होऊ शकतो. सोबतच या दरम्यान, तुम्हाला व्यवसायातील गुंतवणुकीचे खूप फायदे मिळू शकतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. एकूणच या काळात मंगळ आणि केतूचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल.