Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Bank Account

Bank Account : चुकूनही करू नका ‘या’ चुका! नाहीतर कायमचे बंद होईल तुमचे बँक खाते, कसे ते जाणून घ्या

Thursday, September 28, 2023, 10:11 AM by Ahilyanagarlive24 Office

Bank Account : जवळपास प्रत्येकाचे बँकेत खाते असते. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा पोहोचवत असते.शिवाय प्रत्येक बँकेचे बँक व्याजदर वेगळे असते. परंतु जर तुम्ही काही चुका केल्या तर तुमचे बँक खाते कायमचे बंद होईल.

अनेकांची बँक खाती बंद किंवा गोठवली जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने बँक खाते योग्य प्रकारे वापरणे आणि काही चुका टाळाव्यात. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे बँक खाते बंद किंवा गोठवले जाऊ शकते.

Bank Account
Bank Account

योग्य कागदपत्रे

समजा तुम्ही तुमची योग्य कागदपत्रे बँकेत जमा केली नसतील किंवा काही बदल झाल्यास बँक खात्यात ते अपडेट केले नसल्यास तुमचे खाते गोठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे बँक दस्तऐवज अपडेट ठेवा. तसेच तुमच्या ईमेल आयडीसह तुमचा फोन नंबर अपडेट करा.

संशयास्पद व्यवहार

तसेच खातेदाराच्या खात्यात काही संशयास्पद व्यवहार आढळले तर बँकेकडून कारवाई केली जाते. परदेशातून अचानक बँकेत खूप पैसे येणे किंवा देशाबाहेर भरपूर खरेदी करणे या गोष्टी तुमचे बँक खाते गोठवण्याचे कारण बनतात. तसेच जर व्यवहार योग्यरितीने केल्यास तर बँक तुमचे गोठवलेले खाते पुनर्संचयित करू शकते.

खात्यात व्यवहार नसणे

बचत खाते असो, चालू खाते असो किंवा शून्य शिल्लक खाते असो, सर्व प्रकारच्या खातेधारकांनी स्वतःच्या बँक खात्यांबाबत सक्रिय असावे. जर खातेदाराने मागील दोन वर्षांत कोणत्याही प्रकारचा कोणताही व्यवहार केला नसल्यास ही खाती बँकेद्वारे नॉन-ऑपरेटिव्ह बँक खाते यादीत टाकण्यात येतात. त्यामुळे तुमचे बँक खाते निष्क्रिय करू शकते.

केवायसी अपडेट

अनेकजण त्यांचे बँक खाते चालू करतात. परंतु त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष देत नाहीत. बँक खातेधारकांनी त्यांच्या खात्यात केवायसी अपडेट करणे खूप गरजेचे आहे. कारण नियमांनुसार, खातेदारांना दर तीन वर्षांनी एकदा केवायसी अपडेट करावे लागते. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे खाते बँकेद्वारे बंद केले जाईल.

अचानक धनलाभ

समजा तुमच्या बँक खात्यात अचानक लाखो आणि करोडो रुपये आल्यास आणि तुमच्याकडे त्याचा कोणताही पुरावा नसल्यास तुमच्यासाठी समस्या वाढू सहकतात. अशावेळी तुम्ही तुमच्या ताबडतोब बँकेशी संपर्क करावा. समजा कोणत्याही पुराव्याशिवाय कोठूनही पैसे आले तर तुमचे खाते बंद किंवा गोठवले जाते.

Categories ताज्या बातम्या Tags bank, bank account, Bank Account Closure, Bank Account Closure or Freezing Reasons, Bank Account Freezing Reasons
Samsung Smartphone Offer : 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येतील Samsung चे ‘हे’ शानदार फोन, पहा संपूर्ण ऑफर
Shukra Gochar 2023 : सावधान! ‘या’ राशींवर येणार आर्थिक संकट, घ्या विशेष काळजी
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress