Marathi news : पृथ्वीवर एकूण सात खंड असल्याचे आपण शिकलो. परंतु आठवा खंडदेखील अस्तित्वात असल्याचे अलीकडेच सिद्ध झाले आहे. आता झिलँडिया नामक या खंडाचा नवा अधिक सुस्पष्ट असा नकाशा भूगर्भशास्त्रज्ञांनी तयार केला आहे.
सुमारे साडेआठ कोटी वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालींमुळे गोंडवाना या महाखंडाचे विभाजन होऊन आपल्याला ज्ञात असलेले आफ्रिका, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया सात खंड तयार झाले.

परंतु याच भूगर्भीय घडामोडींमुळे अगदी अलीकडेपर्यंत अज्ञात असलेल्या झिलँडिया या खंडाचीही निर्मिती झाली. परंतु निर्मितीपासूनच या खंडाचा तब्बल ९४ टक्के भूभाग पाण्यात बुडालेला आहे.
झिलँडियाचा अवघा ६ टक्के भूभाग पाण्यावर असून त्यावर न्यूझीलंड हा देश आणि त्याच्या भोवतीची बेटे आहेत. मोठा भूभाग महासागरात बुडालेला असल्यामुळे या खंडाबद्दल इतर सात खंडांसारखा अभ्यास करण्यात आला नाही. झिलँडियाबद्दल सर्वप्रथम १६४२ साली एक डच उद्योगपती व नाविक एबल टॅसमॅनने जगाला सांगितले होते..
झिलँडियाचा आकार ५० लाख चौ. किमी
शास्त्रज्ञांनी न्यूझीलँडसह आसपासच्या बेटांवरील खडक आणि महासागराच्या तळावरील खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास केला. त्यानुसार या खंडाचा नकाशा तयार केला. यात झिलैंडियाचा आकार सुमारे ५० लाख चौरस किमी आहे.
खडकांच्या अभ्यासातून पश्चिम अंटार्क्टिकामधील एका पॅटर्नबद्दल समजले आहे. यातून न्यूझीलंडच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर कँप्बेल पठारालगत एक सबडक्शन झोन असल्याचे संकेत मिळतात.