Marathi News : तुमच्या कुंडलीत तुम्ही करोडपती होण्याचा योग आहे का? तुम्हीही श्रीमंत आणि धनवान होऊ शकता का? प्रत्येकाला या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असावे असे वाटते. कारण श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते, पण बहुतेक लोक हे स्वप्न कधीच पूर्ण करत नाहीत.
आज आपण कुंडलीत असणाऱ्या धन योगाबद्दल माहिती पाहणार आहोत. कोणत्या ग्रहांमध्ये आणि कोणत्या घरात धनयोग तयार होतो किंवा करोडपती योग तयार होतो.

कसा बनतो कुंडलीत धनयोग
कुंडलीचे दुसरे घर धनाचे, अकरावे घर लाभाचे आहे. अकराव्या घरातून तुम्हाला किती उत्पन्न आणि नफा मिळेल हे जाणून घेऊ शकता. कुंडलीचा स्वामी चांगल्या घरात असेल तर तुमचा आर्थिक योग पूर्णपणे यशस्वी होईल. या पैशाच्या योगाने तुम्हाला घर, गाडी, प्रॉपर्टी आणि सर्व काही मिळेल.
कोणती घरे बनवतील करोडपती
जर तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या भावात सूर्य असेल, चंद्र नवव्या भावात असेल, याशिवाय पौर्णिमेच्या आसपास तुमचा जन्म झाला असेल आणि गुरू पाचव्या भावात असेल तर त्या व्यक्तीला मान-सन्मान मिळेल. संपत्ती, कीर्ती आणि आयुष्यातील इतर सर्व काही मिळेल.
जर तुमच्या कुंडलीत शनी, शुक्र आणि बुध एकत्र आले तर तुम्हाला व्यवसायात भरपूर फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच प्रचंड संपत्तीचे मालक व्हाल. कुंडलीतील सहाव्या, सातव्या आणि आठव्या घरात चंद्र शुभ ग्रह असेल किंवा या दोन घरापैकी कोणत्याही घरात एखादा शुभ ग्रह असेल तर तुम्ही करोडपती बनता. जर तुमच्या कुंडलीत तुळ, मकर, शनी आणि कुंभ असतील आणि सप्तम घराचा स्वामी शुक्र दशमात असेल तर ती व्यक्ती नक्कीच श्रीमंत होईल.