Bank FD : देशात अनेक सरकारी आणि खाजगी बँका आहेत. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी शानदार सुविधा घेऊन येत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. तसेच प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगळे असते, अनेकजण बँक FD मध्ये गुंतवणूक करतात.
कारण ग्राहकांना बँक FD मध्ये सर्वात जास्त परतावा मिळतो. जम्मू आणि काश्मीर बँकेचा देशातील सर्वात जुन्या बँकांमध्ये समावेश असून येथे तुम्हाला FD वर सर्वाधिक परतावा मिळेल. तुम्हाला सर्वात जास्त कमाई करता येईल. जाणून घ्या सविस्तर.

मिळेल सर्वात जास्त व्याज
आपल्या ग्राहकांना बँक काही एफडीवर जास्तीत जास्त व्याज देत असून यात बँक 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वात जास्त व्याज उपलब्ध करून देत आहे. सर्व दरांवर 7.10 टक्के व्याज दिले जात असून यावर 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7 टक्के दराने व्याज मिळेल.
दीर्घ मुदतीवर मिळेल उत्तम व्याज
तसेच बँक 5 वर्षे ते 10 वर्षांच्या FD वर 6.50 टक्के दराने व्याज देत असून 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या कालावधीवर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे. बँकेच्या सर्वसामान्य ग्राहकांना 333 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के तर ज्येष्ठ ग्राहकांना 6.60 टक्के व्याज मिळाले. ३३४ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 6 टक्के दराने व्याज मिळेल. 271 दिवसांच्या FD बद्दल सांगायचे झाले तर 332 दिवसांपेक्षा कमी FD वर 6 टक्के दराने व्याज मिळेल.
222 दिवसांच्या FD मध्ये सामान्य नागरिकांना 5.60 टक्के आणि ज्येष्ठ ग्राहकांना 6.30 टक्के व्याज मिळेल. तसेच 181 दिवस ते 221 दिवसांच्या एफडीवर 5.60 टक्के, 91 दिवस ते 180 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के आणि त्याच कालावधीतील ज्येष्ठ ग्राहकांना बँक 4.75 टक्के व्याज देईल. 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.60 टक्के दराने व्याज मिळेल. 31 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.50 टक्के दराने व्याज मिळेल. 7 दिवस ते 30 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज मिळेल.