Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महापालिका अंतर्गत बंपर भरती; येथे पाठवा अर्ज !

Published on -

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी चांगली आणि उत्तम असेल, या भरती साठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

नाशिक महानगरपालिका अंतर्गत “जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, भूलतज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम” पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, भूलतज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

वरील भरती अंतर्गत एकूण 96 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे होत आहे.

अर्ज पद्धती वरील भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज मुलाखतीद्वारे होणारआहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३. रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे अर्ज पाठवू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी nmc.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe