Bajaj Electric Scooter : 15000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येणार बजाजची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, पहा संपूर्ण ऑफर

Bajaj Electric Scooter

Bajaj Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता खूप कमी किमतीत बजाज इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. तुमची 15000 रुपयांची सहज बचत होऊ शकते. स्कुटर एका चार्जवर 108 किलोमीटर चालते.

बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर सणासुदीच्या काळात सर्वात मोठी सूट मिळत आहे. हे लक्षात ठेवा की ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स.

हे लक्षात घ्या की ही उत्सवी किंमत केवळ स्टॉक टिकेपर्यंत वैध असणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या सणासुदीच्या सवलतीनंतर चेतक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे आता आणखी स्वस्त झाले आहे.

जाणून घ्या किंमत

किमतीचा विचार केला तर बजाज चेतकची किंमत 1 लाख 30 हजार रुपये (एक्स-शोरूम) असली तरी, 15 हजार रुपयांच्या सवलतीनंतर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 1 लाख 15 हजार रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) घरी आणता येईल.

मिळतील दमदार फीचर्स

बजाज चेतकमध्ये 2.9 kWh बॅटरी असून जी पूर्ण चार्ज केली तर 108 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. या स्कूटरचा जास्तीत जास्त वेग 63 किमी प्रतितास इतका आहे आणि त्याची बॅटरी 5 तासामध्ये 0 ते 100 टक्के चार्ज होते. या स्कूटरमध्ये इको आणि स्पोर्ट असे दोन रायडिंग मोड मिळतील.

या मजबूत सॉलिड मेटल बॉडी स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळतील. कंपनीची 100 पेक्षा जास्त सेवा केंद्रे देशभरात उपलब्ध आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या स्कूटरसोबत काही उत्कृष्ट फायनान्स पर्याय मिळत आहे, जसे की 60 महिन्यांचे कर्ज मिळते.

स्वस्तात करा खरेदी

या जबरदस्त डिस्काउंटनंतर, या स्कूटरची किंमत Ather 450S, Ola S1 Air आणि TVS iQube सारख्या इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा स्वस्त होणार आहे. या विशेष ऑफरचा लाभ सध्या कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये राहत असणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सध्या, कंपनीने इतर राज्यांमध्ये या उत्सव ऑफरच्या अंमलबजावणीची पुष्टी करण्यात आली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe