Samsung Smartphone Offer : जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही सॅमसंगचा 200MP कॅमेरा असणारे 2 स्मार्टफोन 35 हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करू शकता.
अशी जबरदस्त ऑफर Amazon वर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत होईल. Galaxy S23 Ultra 5G आणि Galaxy S22 Ultra 5G हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या ऑफर.
जाणून घ्या Galaxy S23 Ultra 5G ऑफर
आता कंपनीचा हा फोन 12GB/256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 1,03,790 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. याच्या बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 10% झटपट सवलत मिळेल. म्हणजेच 1500 रुपयांपर्यंतची बचत, त्यानंतर किंमत 1,02,290 रुपये इतकी असणार आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये जुना किंवा सध्याचा फोन दिला तर या फोनची किंमत 50 हजार रुपयांनी कमी होईल.
खासियत
Samsung Galaxy 23 Ultra 5G मध्ये 6.8-इंच एज QHD डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला असून ज्याचा रीफ्रेश दर 120Hz आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC वर काम करेल. कॅमेरा सेटअपच्या बाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये मागील बाजूस f/1.8 अपर्चरसह 200-मेगापिक्सलचा प्राथमिक वाइड कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि f/2.4 एपर्चरसह 10-मेगापिक्सेलचा टेलीफोटो शूटर दिले आहे. यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला असून फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Galaxy S22 Ultra 5G ऑफर
हा फोन 12GB/256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 84,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. याच्या बँक ऑफरच्या बाबतीत, तुम्हाला HDFC बँक कार्ड EMI व्यवहारांवर रु. 10,000 फ्लॅट झटपट सवलत मिळेल. या फोनची किंमत रु. 74,999 इतकी असणार आहे.
तुमचा जुना किंवा सध्याचा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन 50,000 रुपयांची बचत करू शकता. एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा फोनची सध्याची स्थिती आणि एक्सचेंज होत असणाऱ्या मॉडेलवर अवलंबून आहे. हा फोन मागील वर्षी 1,09,999 रुपयांना लॉन्च केला त्यानुसार किंमत 35,000 रुपयांनी कमी केली जात आहे.
जाणून घ्या फीचर्स
फोनमध्ये 6.8-इंच एज QHD डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz इतका आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 1 SoC वर काम करेल. यातील कॅमेरा सेटअपसाठी, फोनमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 10 मेगापिक्सेल टेलिफोटो शूटर आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला आहे. फोनच्या समोर 40 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.