Grah Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाला महत्वाचे स्थान आहे. सूर्य हा शक्ती, पद, आदर, पुत्र, क्षमता, आत्मा, ऊर्जा, कीर्ती इत्यादींचा कारक मानला जातो. म्हणूनच जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम दिसून येतो. दरम्यान, ग्रहांचा राजा सूर्य 17 नोव्हेंबर 2023 रोजी वृश्चिक राशीतून भ्रमण करणार आहे. ज्यामुळे काही राशींना खूप फायदा होणार आहे.
या काळात तीन राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे. या काळात नशीब देखील साथ देईल. या काळात पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी-
धनु
17 नोव्हेंबरपासून धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. सूर्यदेवाची विशेष कृपा राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. या काळात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करता येईल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल.
वृश्चिक
वृश्चिक राशीतील सूर्याचे संक्रमणही या राशीच्या लोकांसाठी उत्तम असेल. वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात जीवनात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक अडचणी दूर होतील.
मेष
वृश्चिक राशीतील सूर्याचे संक्रमणही या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. यावेळी तुमची तब्येत सुधारेल. नोकरदार लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. एकूणच या काळात नशिबाची पूर्ण साथ असेल.