Onion News : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला गुरुवारी सरासरी ३९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गत सप्ताहाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात १४०० रुपयांची घसरण झाली. २७ ऑक्टोबर रोजी सरासरी ५३०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला गेला होता.
दिवाळीनिमित्त लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्या ९ ते १८ नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजापेठेत आणला दिवाळी आता आठवडाभरावर आली असून,
त्यासाठी शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडतील, अशी अपेक्ष होती. त्यामुळेही शेतकऱ्यांनी चांगला दर दिसताच कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला. मात्र आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर झपाट्याने घसरले.
कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या किमान निर्यातमूल्यात ८०० डॉलर प्रतिदराने वाढ केल्याने जवळपास निर्यात ठप्प झाली आहे.