Mobile Addiction : मोबाईल हा सर्वांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. रोजच्या व्यवहारात मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणत होतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यात मोबाईल हा एक महत्वपूर्ण घटक बनला आहे. अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहतात.मात्र मोबाईलचा अतिवापर हा आरोग्यास हानिकारक ठरतोय. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यास अनेक दुष्परिणाम होतात. जाणून घ्या याबद्दल.
आपण सहज मोबाईल हातात घेतो आणि रिल्स पाहण्याच्या नादात कसा वेळ निघून जातो समजत नाही. आपन स्वतःहून मोबाईलकडे वळतो. या सवयीमुळे आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
मोबाइलचे तोटे
मोबाईलच्या स्क्रीनवरून येणारा निळा प्रकाश ( ब्लु रे ) हा डोळ्यांसाठी हानिकारक असतो. दरम्यान, याचा आपल्या झोपेवरही परिणाम होतो. रात्री उशीरपर्यंत मोबाईल पाहिल्यामुळे आपल्या झोपेवरही याचा परिणाम होतो.
दरम्यान, सतत मोबाईल वापरल्यामुळे स्क्रोल करण्याची सवय तर होतोच मात्र यामुळे थोडा वेळ मोबाईल वापरास न मिळाल्यास आपल्याला चिंता वाटू लागते. आणि हे एक नैराश्याचे लक्षण आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडिया वरती सतत काही न काही ट्रेंड सुरु असतात. यामुळे अनेकांना आजकाल FOMO (Fear of Missing Out) होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला एक भीती आहे की जर तुम्ही सर्व ट्रेंड्सला फॉलो नाही केलं तर घेतला नाही तर तुम्हाला मागे राहिल्यासारखे वाटू लागते. याचबरोबर सतत मोबाईल वापरल्यास आपण एकाच स्थितीमध्येव राहतो. यामुळे याचा परिणाम हा हात आणि खांद्याच्या स्नायूंवर होतो.
स्क्रोलिंगची सवय कशी थांबवावी
जास्त वेळ मोबाईल वापरण्याची सवय ही थांबवली जाऊ शकते. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल वापरण्याची वेळ सेट करा. दरम्यान, रात्री एका ठराविक वेळेनंतर मोबाईलचे इंटरनेट बंद करा. आपल्या या नियमावरती कायम रहा. यामुळे थोड्याच दिवसानंतर तुम्हाला मोबाईलच्या सवयीपासून सुटका मिळेल.
यामुळे वेळेवर झोप ही येईल आणि तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला चांगले वाटू लागेल. दरम्यान, मोबाईलला येणाऱ्या नोटिफिकेशन यामुळे आपल्याला पटकन फोन पाहण्याची इच्छा होते. यामुळे नोटिफिकेशन बंद करावेत. जेणेकरून मोबाईलकडे सतत लक्ष लागून राहणार नाही. मोबाईल मध्ये अनेक अनावश्यक अँप आपण वापरतो. हे अॅप्स डिलीट करून टाका.
दरम्यान, फोन स्क्रोल करताना, स्क्रीनचा प्रकाश पूर्णपणे मंद करा जेणेकरून त्याचा डोळ्यांवर कमी परिणाम होईल.
झोपताना, एखादे पुस्तक वाचणे हा देखील उत्तम पर्याय ठरतो. यामुळे तुम्हाला शांत झोप मिळेल आणि तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहील.