Vitamin C : ही लक्षणे दर्शवतात व्हिटॅमिन – सीची कमतरता, करा हे उपाय..

Published on -

Vitamin C : आपल्या शरीरामध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात. प्रत्येक व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. शरीरामध्ये व्हिटॅमिण सी हा एक महत्वाचा घटक आहे. मात्र शरीरामध्ये याची कमतरता असल्यास लक्षणे जाणवू लागतात. याच्या कमतरतेमुळे आपणास त्रास उद्भवतो. जाणून घ्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता कशी ओळखावी.

व्हिटॅमिन-सी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होऊ शकतो.या स्कर्व्हीमुळे तुम्हाला इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्याच्या कमतरतेची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. जाणून घ्या व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत आणि कोणते खाद्यपदार्थ त्याची कमतरता भरून काढू शकतात.

व्हिटॅमिन सी हा असा घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये साठवला जात नाही. व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे पोषक आहे, त्यामुळे ते शरीरात साठवता येत नाही. यामुळे, त्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आपण दररोज आपल्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश केला पाहिजे.

शरीरात त्याच्या कमतरतेमुळे, तुम्ही स्कर्वीचा बळी होऊ शकता. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, व्हिटॅमिन सी हे एस्कॉर्बिक ऍसिड आहे, जे आपल्या वाढीसाठी आणि उपचारांसाठी आवश्यक आहे. काही महिन्यांपर्यंत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही होऊ शकतो. दरम्यान, आहारामध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्या नसल्यामुळे हा आजार उदभवू शकतो.

दरम्यान, आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास आपल्याला थकवा,अशक्तपणा,सांधे दुखी, चिडचिड, दात कमकुवत होणेतसेच हिरड्या मधून रक्तस्त्राव होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात.

याचबरोबर, पायांना सूज येणे तसेच शरीरावर सहजपणे जखम होणे जखमा लवकर बऱ्या न होणे तसेच केस कमकुवत होणे,नाकातून रक्तस्त्राव होणे आणि प्रतिकारशक्तीची कमतरता जाणवणे ही लक्षणे दिसू लागतात.

दरम्यान, हि कमतरता भरून काढण्यासाठी आहारामध्ये लिंबूवर्गीय फळसंत्री, लिंबू, द्राक्ष या फळांचा समावेश करावा. तसेच संतुलित आहार घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe